prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – गुलाब

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – गुलाब

0
98

कधी गुलाबी कधी श्वेत रंगी फुलांचे
कधी लाल गडद कधी पिवळ्या रंगाचे
गुलाब फुलांचे क्षुप छोटेसे असते
पाहताच क्षणी नजर त्यांवर खिळते .

कधी इवलेसे कधी मोठ्या पाकळ्यांचे
कधी वाटतात बोचरे त्यांचे छोटे काटे
पाकळ्या कोमल, मंद मंद सुवासाचे
हाती येता सहज हुंगून पहावे वाटते.

माळावे कुंतलांत, स्रीयांना वाटते
खिशात शर्टच्या ठेवावे पुरूषांना वाटते
प्रतिक प्रेमाचे म्हणून प्रियजनांस ध्यावे
फुलदाणीत ठेवून पहात त्यास रहावे.

गुलाबाचे फुल सहज नयनांना भावते
मनात राहून दिवस ताजतवाने ठेवते.
प्रियेची होऊन आठवण तिज ध्यावे वाटते
प्रेमाचा हाच रंग ना,मन त्याच्या रंगात रंगते.

डाॅ. सौ. स्मिता सदानंद मुकणे
ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here