
भिमाच्या संसाराचा गाडा,
एकटीने ओढला,
दु:खाच्या डोंगराला तिने,
धैर्याने फोडला…१.
राजवाड्याचं स्वप्न सोडून,
झोपडीत जी रमली,
माझ्या भिमाच्या पाठीशी,
जी सावली होऊन उभी
राहिली…२.
कपाळावर कुंकू अन्
डोळ्यात स्वाभिमान होता,
तिच्या साध्या राहणीतही,
एक मोठा सन्मान होता…३.
लेकरांना पोटात मारून,
समाजाला जगवलं,
रमाईने सुखाचं देणं,
साहेबांच्या चरणी अर्पिलं…४.
आज जयंती निमित्त,
नतमस्तक होतो चरणी,
तुझ्या उपकारांची आई,
कशी उतराई होईल ही
लेखणी?…५.
दीन-दलितांची माऊली,
तू ग कोटींची आई,
युगायुगांत अमर राहील,
तुझी माया ग रमाई!…६.
(C)(R) स्वरचित रचना
सौअनुराधा मारचट्टीवार
हैदराबाद तेलंगाना















