
फुलांचा राजा म्हणून
उगीच नाही मोठेपण
काट्यांवर स्वार होऊन
हसत ठेवावे लागते मन ।।1।।
गुलाबाचे काटे पाहून
मनाला प्रश्न पडत गेले
किती सुंदर रूप जणू
दुःखात आनंदाचे भान दिले ।।2।।
किती आकार, किती रंग
रचना अप्रतिम ,मनमोहक
विधात्याने दिले वरदान
प्रेमात जीव ओवाळी बिनधोक ।।3।।
साज शृंगार प्रेमाचा करुनी
गुलाब पुष्प हाती आले
अलवार मूक भावनांना
त्या गुलाबानेच आपले केले. ।।4।।
सात जन्माची बांधली गाठ
गुलाबच सहजीवन साक्षीदार
मार्गावरी विखुरले गुलाबासवे काटे
परि जीवनबाग फुले बहारदार ।।5।।
सौ. यादव उज्ज्वला राजेंद्र
हडपसर, पुणे.















