
सुंदर गोजिरी, सोज्वळ साजिरी
भिमरायाची अर्धांगिनी रमाई
कितिही दुःख आले तरी
कधी ना खचली भिमाची रमाई….!!
फाटके लुगडे घाली शिवूनी
निट नेटकी राहणी तिची
जरी होती गरीबीची परिस्थिती
तरीही डगमगली नाही कधी ती….!!
चार मुलांची देवून आहूती
दुःखाने तळमळली जरी रमाई
पदरात गुंडाळूनी राजरत्नाला
हींमतीने शेवटचा निरोप देई…..!!
मोडल्या त्यांनी सोन्याच्या बांगड्या
पाहूनी उपाशी अनाथ मुलांना
रमाई झाली नवकोटीची माता
जेवू घालूनी सगळ्यांना…..!!
माता रमाई तुझ्या स्फूर्तीने
भिमाच्या पंखात बळ आले
घेवूनी उंच भरारी भिम
संविधानाचे शिल्पकार झाले…..!!
अर्धा संसारातून माता रमाई
प्राणज्योत तुझी मावळली
प्रेरणाज्योत माता रमाई
आंबेडकरांची तुच झाली…..!!
सौ रंजना धर्मपाल आटे
जिल्हा वर्धा















