
सुंदर माझा गुलाब
रंगला अनेक रंगात
प्रत्येकाचा भाव वेगळा
पण बसला मना मनात।।१।।
कुणाला आवडतो गुलाबी
कुणाला अबडतो पिवळा
प्रत्येकजण अर्थ सांगतो
आपल्या मनावरच वेगळा।।२।।
लाल गुलाबाचे महत्त्व फार
प्रेमाचा तो असतो आधार
लाला गुलाब दिल्यावर मग
सुरेख फुलतो आपला संसार।।३।।
पिवळा गुलाब मैत्रीचे प्रतीक
अनेक नात्याला जोडून जातो
दूर गेलेल्या नात्याला सुध्दा तो
क्षणात बघा आपलेसे करतो।।४।
गोड गोड गुलाबाची माझ्या
वाटते मजला रीतच न्यारी
सुंदर माझ्या या गुलाबाची
प्रीती आहे पहा प्यारी प्यारी।।५।
गुलाब माझा आनंद देतो
सुखाचा संसार फुलवितो
जरी झाले भांडणं कुणाचे
गुलाब माझा तो सोडवितो।।६
किती सांगू गुलाबाचे गुण
ओठांत आहे हसरा भाव
प्रेम फुलवित रहातो तोच
स्वप्नांत सजतो सुंदर गाव।।७।।
प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर















