prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – रमाई

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – रमाई

0
114

काय वर्णावी माझ्या
रमाईची ती कथा
अनंत कष्ट सोशीले
जीवनात होत्या व्यथा

बालपणी आईवडिलांचे
छत्र होते हरवले
मामा शंकराने मग
भावंडांना सांभाळले

छोट्या भावंडांचा करी
सांभाळ ती छोटी रमा
नव्हती बाळगली तीने
कष्टाची कसलीही तमा

महासुर्याची उर्जा होऊन
तेवत होती ती रमाई
कोटी कोटी हृदयाची
बनली आहेस आई

आयुष्य होते तुझे ग
धगधगते रणसंगर
हसतच पार केलाय
कष्टाचा महा डोंगर

भीम परदेशी जाऊन
राहायचे शिकायला
सांभाळ करीत असे
धीर देत कुटुंबाला

आहे का हो अशी एखादी
तुमच्या, आमच्यात रमाई
दोन्ही कर जोडून तुला
वंदन करते ग आई.

शोभा वेले, नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here