
‘रमाई ग्रुप ऑटो युनियन’ चा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश
हिंगोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – त्यागमुर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीचे औचित्य साधून वसमत येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे माता रमाई ग्रुप ऑटो युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीत (VBA) जाहीर प्रवेश केला.
कार्यक्रमाची सुरुवात आणि अभिवादन
कार्यक्रमाचा प्रारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. त्यानंतर माता रमाई यांच्या तैलचित्राचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. हा संपूर्ण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा कार्याध्यक्ष राजु इंगोले, माजी जिल्हा महासचिव सिद्धांत गायकवाड, माजी संघटक रमेश भुजबळ, नेते आनंद खरे सर, युवा नेते राजु करवंदे आणि विकी मोरे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी माता रमाईंच्या जीवनावर प्रकाश टाकत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सहसचिव राहुल करवंदे आणि युवा जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण बाराहाते यांच्या नेतृत्वाखाली ‘माता रमाई ग्रुप ऑटो युनियन’च्या पदाधिकाऱ्यांनी पक्षात प्रवेश केला. मान्यवरांनी त्यांचे पक्षात स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवी डोंगरे (अध्यक्ष), करण ठोके (उपाध्यक्ष), विजय कांबळे (सचिव), साहेबराव खंदारे, सिद्धार्थ गायकवाड, विजय एंगडे, जगदीश देशमुख, सुनील डाके, संतोष पाचंगे, अमोल गायकवाड, रामा पोटभरे, खंडागळे मामा, तानाजी गायकवाड, शिरसाट दादा, मनोज गायकवाड, अज्जू भाई, श्रावण परसवाळे, अरविंद थोरात, राजू गायकवाड, बालाजी पाईकराव, रतन गायकवाड, राष्ट्रपाल आवटे, गणेश इंगवे आणि गंगाधर गायकवाड आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.















