prabodhini news logo
Home ठळक बातम्या फुले-शाहू-आंबेडकरी विचारांनी प्रेरित होऊन ठोंबे बंधूंचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश!

फुले-शाहू-आंबेडकरी विचारांनी प्रेरित होऊन ठोंबे बंधूंचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश!

0
67

अहमदनगर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – वंचित, शोषित आणि उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र संघर्ष करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारेने प्रेरित होऊन, बाभुळगाव येथील प्रदीप ठोंबे आणि खांडका येथील सचिन ठोंबे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह पक्षात जाहीर प्रवेश केला. ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्वाभिमानी राजकारणावर विश्वास ठेवून झालेला हा प्रवेश आगामी काळात जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणारा ठरेल. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या नेतृत्वाखाली आणि ज्येष्ठ नेते व सल्लागार जे. डी. शिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश पार पडला.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष योगेश साठे म्हणाले की, “वंचित बहुजन आघाडी ही केवळ राजकीय पक्ष नसून परिवर्तनाची मोठी ताकद आहे. प्रदीप आणि सचिन ठोंबे यांच्यासारख्या सामाजिक जाणीव असलेल्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे बाभुळगाव व खांडका परिसरात पक्ष अधिक सक्षम झाला आहे. जनतेच्या प्रश्नांवर आम्ही आता अधिक आक्रमकपणे भूमिका मांडू.” ठोंबे बंधू प्रवेशानंतर आपली भूमिका मांडताना प्रदीप व सचिन ठोंबे म्हणाले, “फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारा आणि बाळासाहेब आंबेडकरांचे खंबीर नेतृत्व हेच वंचित घटकांना न्याय देऊ शकते. या विचाराने प्रेरित होऊन आम्ही पक्षात आलो आहोत. आता गावोगावी जाऊन वंचित बहुजन आघाडीचे संघटन मजबूत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

यावेळी जिल्हा संघटक सुधीर ठोंबे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश क्षीरसागर, युवा शहराध्यक्ष योगेश गुंजाळ, जिल्हा सदस्य फैरोज पठाण, विनायक गोरखे, देविदास भालेराव, संतोष पवार, कैलास पगारे, विजय मिसाळ यांसह परिसरातील अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here