prabodhini news logo
Home कोरची परीक्षाकाळात रात्री वीजपुरवठा खंडित करू नये – आमदार रामदासजी मसराम यांची सूचना

परीक्षाकाळात रात्री वीजपुरवठा खंडित करू नये – आमदार रामदासजी मसराम यांची सूचना

0
111

कोरची प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दिनांक 11 फेब्रुवारी 2026 कोरची तालुक्यात बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या असून दहावीच्या परीक्षा काही दिवसांत सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व त्यांना अभ्यासात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी विशेषतः रात्रीच्या वेळेत वीजपुरवठा खंडित करू नये, अशी सूचना आमदार रामदासजी मसराम यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना केली आहे.

परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळावा, यासाठी विभागाने योग्य नियोजन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच पशुवैद्यकीय (वेटरनरी) रुग्णालयात आवश्यक उपकरणे व विविध यंत्रणांची कमतरता असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे पशुपालकांना उपचारासाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आले आहे.

याबाबत आमदार रामदास मसराम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने जिल्हा स्तरावर मागणी प्रस्ताव पाठवून आवश्यक उपकरणे व सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात, असे निर्देश दिले आहेत. पशुपालकांची गैरसोय टाळण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रसंगी उपस्थित: काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कोरची मनोज अग्रवाल, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन पाटील नाट, धनपाल मिसार सर, काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष सदरूभाई भामानी, उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here