
कारंजा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दिनांक 08 फेब्रुवारी रोजी,दि.बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीची निवडणूक संपन्न झाली. निकालानंतर त्यामध्ये प्रा.राहुल महाजन कार्यकारणी सदस्य पदाकरिता करिता प्रचंड मताधिक्याने निवडून आले. राहुल महाजन यांचे शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात चांगले योगदान आहे.यापूर्वी त्यांनी कि.न. गोयनका महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात कित्येक वर्ष माजी विद्यार्थी म्हणून सेवा दिली आहे. विशेष म्हणजे प्रा.राहुल महाजन बी.जी.ई. संस्थेद्वारा संचालित कि.न. महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहेत व मराठी अध्यापक परिषद,विदर्भ जुनिअर कॉलेज टीचर असोसिएशन अकोला जिल्हा येथे सक्रिय पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.व येथे उल्लेखनीय म्हणजे इ सन 2023 मध्ये राहुल महाजन यांनी कार्यकारणी सदस्य पदाकरता अर्ज दाखल केला होता. परंतु त्यावेळी काही वरिष्ठांच्या आग्रहामुळे निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे 2023 ची कार्यकारणी सदस्य पदाची निवडणूक अविरोध झाली होती. हे विशेष आहे. प्रा.राहुल महाजन विजयी झाल्यामुळे कारंजा व अकोला येथील त्यांच्या मित्र परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि सर्व स्तरातून त्यांचेवर स्वागत आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सदर निवडणूक डॉक्टर आर.बी.हेडा यांच्या मार्गदर्शनात विद्याविकास पॅनलतर्फे त्यांनी लढविली आणि त्यांनी विजयाचे श्रेय मानद सचिव डॉक्टर पवनदादा माहेश्वरी व सर्व आजीवन सदस्य यांना दिले आहे.व हा विजय काका स्व.आप्पाजी महाजन यांना समर्पित केला आहे.















