prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – महाशिवरात्री

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – महाशिवरात्री

0
97

महाशिवरात्र महिमा थोर
शिवपार्वती विवाह ,
मनोभावे स्मरूउभयता
भक्तासाठी घेई धाव ।।1।।

कैलासावरी ध्यानस्थ होऊन
कृपादृष्टी करी भक्तावरी ,
सृष्टीचे पालनहार तुम्ही
जयघोष ओठी श्रीहरी ।।2।।

ओम नमः शिवाय मंत्र
सदैव माझ्या ओठी येई,
तुमच्या नामाशिवाय देवा
कार्य हाती मी न घेई ।।3।।

गळा नागभूषण शोभे
भस्म रेखिले शरीरावरी,
रुद्राक्षांच्या माळा परिधान
महादेव तुम्ही त्रिशूलधारी।।4।।

भोळे सांब शिव तुम्ही
जटांमध्ये विराजे गंगा,
पचविले विष सहज
कंठ शोभे नील रंगा ।।4।।

श्वेत पुष्प वाही भोलेनाथा
बेलपत्र अर्पिले शिवलिंगावरी,
तनमन अर्पुनी प्रभु चरणी
दारी उभी नंदीची स्वारी।।6।।

सौ. यादव उज्ज्वला राजेंद्र
हडपसर, पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here