
प्रीतफुलांच्या ओंजळीत
चेहरा सारा झाकून घेतो;
साठवतो ह्रदय पापण्यांत,
जीव प्रीतीत झोकून देतो.
अतूट असे बंध प्रेमाचे
तुझ्या- माझ्या भावनांचे;
हात तुझा असता हाती,
सार्थक होई जीवनाचे.
रुते काटा पायात माझ्या
नयनी तुझ्या येई पाणी;
दोन जीवांचं एकच मन,
गाती प्रीतीची प्रेमळ गाणी.
घेतो साठवून काळजात
तुझ्या अबोल वेदनांना;
अर्पण करतो फक्त तुला,
माझ्या अंतरीचे भावनांना.
प्रीत माझी अशी अथांग
ह्रदय तुझं ठेवलं जपून;
अता इश्काच्या बाजारात,
घेतलं स्वतःला खपून .
मागतो फक्त ओंजळभर
तुझ्या पवित्र प्रेमाचं दान;
निखळ प्रीतीला निभावण्या,
करतो माझ्या जीवाचं रान.
रवि ताकसांडे
गडचांदुर जि. चंद्रपूर















