
प्रेम तुझे माझे जुळता
हसले चंद्र, सुर्य,तारे
आकाश ही निरभ्र झाले
सुटले प्रेमाचे वारे…..
बहरली झाडे,वेली
गुणगुणती भुंगे फुलांवरती
सुगंधाने मन मोहून गेले
ताबा नसे मनावरती……
बहरुनी गेले मन माझे
दिसू लागले सर्व नवनवीन
मनातले चांदणे चमचम करी
भासे ना काही मज तुजविण……
प्रेमाचे रंग इथे अनेक
उधळूया आपण भरभरुनी
नको बहाणे, रुसवे, फुगवे
हातात हात घेवू प्रेमानी……
वेड लागता प्रेमाचे
मन हे सैराट झाले
घेवूनी उंच भरारी
आकाशी ऊडू लागले…..
मनाचे तुटता तारे
मन हे झाले दिवाणे
हळूच गाऊ लागले गाणे
करुनी प्रेमात बहाणे……
सौ रंजना धर्मपाल आटे
जिल्हा वर्धा















