
नमन शिवास
भक्ती भावे करु
भाव हे मनीचे
कायमच स्मरु ||१||
अंतराळ व्यापे
ब्रम्हा विष्णू शिवा
त्रिखंडी प्रसिद्ध
नमन त्रिदेवा ||२||
त्रिशूल, डमरू
हलाहल उरी
साप गळ्यामधे
गंगा शिरावरी ||३||
पत्नी ती पार्वती
अर्धांगिनी शोभे
गणेश, कार्तिक
पुत्रद्वय लाभे ||४||
महाशिवरात्री
व्रत हे शिवाचे
जो करेल त्याच्या
सार्थक जन्माचे ||५||
(स्वरचित)
©® नीला चित्रे
चिंचवड पुणे















