prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – महाशिवरात्री

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – महाशिवरात्री

0
73

हिमालयीच्या कुशीत विसावलेली,
ती एक साधी राजकन्या,
पण ध्यास तिचा एकच होता,
तो ‘कैलासपती’ अनन्य…१.

डोळ्यांत स्वप्न शिवाचे,
हृदयात नामाचा जप,
त्याला जिंकण्यासाठी तिने
मांडले, कठोर असे तप…२.

​तो शांत, अघोरी, वैरागी,
स्मशानात ज्याचा वास,
ज्याला न कसली ओढ,
ना सुखाची काही आस…३.

पण तिच्या निष्ठेपुढे अखेर,
महादेवाही हारला,
प्रेमाच्या त्या अथांग सागरात,
वैराग्याचा बांध फुटला….४.

​तिच्या नयनांत पाहिले त्याने,
स्वतःचेच प्रतिबिंब,
निसर्गही डोलू लागला,
उमटले हर्षाचे तरंग…५.

गळ्यात रुद्राक्ष माळा,
जटेत गंगार्पण,
शक्तीने शिवाला केले,
पूर्णपणे समर्पण…६.

दोन जीव एक झाले,
सृष्टीचा हा पहिला सोहळा,
अर्धनारीनटेश्वर रूपाचा,
तो अनुपम सोहळा…७.

ना अंत या प्रेमाला,
ना कुठली मर्यादा,
शिव-पार्वतीचे नाते,
जगासाठी एकच श्रद्धा…८.

स्वरचित रचना
सौअनुराधा मारचट्टीवार
हैदराबाद तेलंगाना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here