
प्रेम सौम्य आनंदी तीव्र
आव्हानात्मक असू शकते l
प्रेम खोल आणि शक्तिशाली
भावना अनेक रूपात दिसते l
रोमँटिक प्रेमात अनेकदा
आकर्षण जवळीक वचनबद्दता l
ज्यात एकत्र रहाणे उत्कटता
भावनिकता प्रतिज्ञाबद्धता l
माणूस वेडा झाल्यानंतर
त्याला इस्पितळात नेतात l
मुलगा प्रेमात वेडा झाला
तर त्याचे लग्न करून देतात l
असतं प्रेम हे धरायचं
असतं काळजी करायचं l
असतं प्रेमाच नातं पवित्र
लग्न करून देणे उपाय नसायचं l
प्रेमाला निस्वार्थ समर्पण
त्याग विश्वास मानले जाणे l
प्रेम केवळ आकर्षण नसून
दुसऱ्याच्या सुखात सुख शोधणे l
गुण दोषासह स्वीकारावे
प्रेम भांडणानंतरही टिकावे l
असतो आदर महत्वाचा
कठीण काळातही सोबत राहावे l
प्रा. डॉ. हंसराज रंगारी
कल्याण















