
शुद्ध पाण्यापरी पवित्र
मनातील भावतरंग
रोजचेच प्रेमाचे शब्द
ज्यात आयुष्याचे भरले आहेत रंग….
एकच दिवस का
रोजचेच हृदय भरलेले
सुखदुःखाच्या वेली वरती
मधुर क्षण आहेत भरलेले…
कधी गुलाब माळलेला
सजनी केस सांभार
हळूच माळलेला गजरा
आनंदी आयुष्य करते साजरा..
कर्तव्याचा भार सांभाळताना
ना पाहिली दिस कधी रात्र
अनेक प्रश्न भेडसावताना
खंबीर मायेचे आहे छत्र ..
हे नाते भासते
जणू युगायुगांचे
प्रीतीची बाग फुललेली
प्रेम तुझे नी माझे कायमचे..
गायकवाड मनोज रामचंद्र
शहापूर जिल्हा ठाणे.©















