prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – प्रेम म्हणजे प्रेम

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – प्रेम म्हणजे प्रेम

0
162

प्रेमविना जग सुने
प्रेम नाही तर सारे उणे
प्रेम लाभे प्रेमळाला
प्रेम जीवाचा जीव्हाळा
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे
प्रेम सकलांना वाटावे
प्रेमाची जातन्यारी
माया ममता वत्सल भारी
हृदयाच्या कोंदणात
उजळते प्रेम जोत
सहज़ शुद्ध निर्मळ भाव
निर्व्याज आणि सात्विक भाव
मित्रमैत्रिणीचे प्रेम लाडिवाळ
अवीट गोड स्वहृदय रसाळ
बंधू भगिनी प्रेमाचे नाते अनमोल
नाही उपमा तयाला पवित्र सुंदर
पती पत्नीचे मंगलप्रेम
हृदयविना गाते गीत रुनझुन
जे प्रेम कधी ना दिसते वरवर
परी जे नित्यची फुलवी अंतर
प्रेमाला नसते भाषा
नयन बोलती मुग्ध भाषा
नेत्र पल्लवीतूनही उमजते
प्रेम बहरते प्रेम नांदते
ढोंगी मतलबी प्रेमाची
असते एक जात
वरपांगी बोलून जे
करते विश्वासघात
प्रेम विकत मिळे ना बाजारी
ना मिळे कधी शेजारी
प्रेम सजवू प्रेम रुजवू
प्रेमाचे नाते घट्ट रुजवू
या प्रेमाचा करूया गौरव
प्रेमा मुळेच जगते‌ मानव!

निर्मला ज्ञानेश्वर बोरकर
नागपुर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here