prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – नको दुखावू माझे...

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – नको दुखावू माझे मन

0
106

नको दुखावू माझे मन
हृदयात तुझ्या ठेव मला
किती होते प्रेम माझे ते
कसे सांगू मी वेड्या तुला।।१।।

आठवणीत तुझ्या आता
मला नेहमी बघ रडू येते
ओठातले सारेच भाव
फक्त ह्रदयात दडून जाते।।२।।

काय चुकले होते माझे
त्याची शिक्षा मला मिळाली
तेंव्हा मात्र खऱ्या प्रेमाची
महती मला तेंव्हा कळाली।।३।।

झाले मन उदास खूप
आता डोळ्यात पाणी येते
जपले असते तर संपले नसते
फक्त हेच सांगत राहते।।४।।

दूर झाले नाते आपले
तरीही जपत राहायचे
हृदयात झालेल्या जखमांना
पुन्हा आठवून पहायचे।।५।।

काय चुकले होते माझे
माझे प्रेम नाही कळले
नशीबाचाच खेळ सारा
भाग्य कधी कुणा टळले।।६।।

पण तुझ्या माझ्या नात्याची
खूपच घट्ट आहे ती वीण
नकळत एकमेकांना पहाता
निघून जातो सारच क्षीण।।७।।

अनोखे हे बंधन आपले
नकळतपणे जुळून आले
तुझ्या माझ्या नात्याला
पुन्हा चैतन्य देऊन गेले।।८।।

प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here