prabodhini news logo
Home कर्नाटक प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – नको दुखवू माझे...

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – नको दुखवू माझे मन

0
101

तुझी आतुरतेनी वाट पाहते
जीव होतो माझा कासावीस
तुझ्यावर जीवा पाड प्रेम करते
गुदमरतो माझा आता रे श्वास

नको दुखवू माझे मन
तुझ्या साठी सोडले घरदार
सोडले आईबापाचे बंधन
तूच माझा आता खरा आधार

घे जरा मला समजून
नको मला गाडी बंगला
तुझ्या सोबतीन राहीन
तुझा माझा संसार थाटला

स्वप्न माझे होऊ दे पुरे
तुझ्या विश्वासावर बंधने इमले
साता जन्मीचे हे फेरे
रेशीम गाठिनी नाजूक गुंफले

प्रतिभा सडेकर
वडगाव बेळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here