
वसमत प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे. प्रकल्पाधिकारी सिद्धार्थ गोंवदे यांच्या मार्गदर्शनाखाली समतादूत मिलिंद आळणे, गुरुनाथ गाडेकर यांनी कार्यक्रमांच्या सुरुवातीस लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मनोहर सर हे होते. प्रमुख पाहुणे बसवंते साहेब हे होते. समाजसुधारक, क्रांतिकारक विचारांचे प्रेरणास्थान व थोर शिक्षक लहुजी साळवे वस्ताद यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
लहुजी साळवे वस्ताद यांनी समाजातील वंचित व दुर्बल घटकांना शिक्षण, स्वाभिमान व आत्मसन्मानाची दिशा दिली. त्यांनी अनेक तरुणांना व्यायाम, शिस्त व सामाजिक जाणीवेचे धडे दिले. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक समाजसुधारक घडले.
यावेळी वक्त्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, लहुजी साळवे वस्ताद यांचे विचार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या विचारांचा अवलंब करणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन लोखंडे यांनी केले या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.















