prabodhini news logo
Home ठळक बातम्या वडेगाव (खांबा) त्रिनेत्र महादेव भिमलकसा पाटिलदेव पहाडीवर महाशिवरात्री उत्सव साजरा

वडेगाव (खांबा) त्रिनेत्र महादेव भिमलकसा पाटिलदेव पहाडीवर महाशिवरात्री उत्सव साजरा

0
89

साकोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – तालुकातील स्मार्ट ग्राम वडेगाव येथे त्रिनेत्र महादेव भिमलकसा पाटिलदेव पहाडीवर रम्य वातावरणात शिव भक्तीत राम्मान होत भाविकांनी शिवरात्रीउत्सव साजरा केला.
यावेळी पाहुण्यासचे हस्ते महादेव पार्वाती यांच्या कोरीव मूर्तीला आंघोळ स्नान घालून हळदी चंदन उटणं लावून पूजन घालून भजनाच्या रंगात रंगून काला फोडून उत्सवाची सुरवात केली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माधुरी गहाणे सरपंच, यांचे प्रमुख उपस्थिती डॉ सुरेश कुमार पंधरे संस्थापक बि एम आर एफ, शामराव लांजेवार, भाऊराव लांजेवार महीपाल राणे प्रहालाद कापगते, गिरीधरी रहांगडाले व गावातील मुख्य पदाधिकारी यांचे हजेरीत कार्य पार पडले आदल्या दिवशी रात्री जागरण करून भक्ती भावांनी भक्त शिव हनुमान राम नाम जपून रंगले होते. सायंकाळी काला हंडी फोडल्या नंन्तर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यकर्मासाठी आयोजक विठ्ठल लांजेवार,देवराम डोमळे, सुनील राऊत,देवचन्द ठाकरे हे होते.
यावेळी परिसरातील पुरुष स्त्रिया विदयार्थी भाविक हजारो संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here