prabodhini news logo
Home घुग्घुस “घुग्घुस नगरपरिषदचा भ्रष्टाचार” संबंधित अधिकारी आणि जनप्रतिनिधी वर कारवाही करायची मागणी –...

“घुग्घुस नगरपरिषदचा भ्रष्टाचार” संबंधित अधिकारी आणि जनप्रतिनिधी वर कारवाही करायची मागणी – अमित बोरकर

0
147

घुग्घुस (जि. चंद्रपूर) : शहराच्या मार्केट लाईन परिसरातील सुमारे १०० वर्षांहून अधिक जुना ऐतिहासिक तलाव सध्या माती व बांधकाम मलबा टाकून बुजवला जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. हा तलाव केवळ जलस्रोत नसून शहराच्या पर्यावरणीय संतुलनाचा महत्त्वाचा आधार मानला जातो. मात्र खासगी स्वार्थासाठी त्याचा गळा घोटला जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.

स्थानिक नागरिक अमित बोरकर (उबाटा) यांनी मुख्याधिकारी नगर परिषद कार्यालय घुग्घुस, जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे सविस्तर तक्रार अर्ज सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे. अर्जात नमूद केल्याप्रमाणे, तलावाच्या अनेकशे चौरस फुटांवर आधीच भराव करण्यात आला असून प्रशासन मात्र डोळेझाक करत असल्याचा आरोप आहे.
पर्यावरण आणि जनजीवनावर घाला

तलाव बुजवल्यास होणारे परिणाम गंभीर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. भूजल पातळीत मोठी घट होण्याची भीती, गणेश व देवी विसर्जनासाठी पर्यायी जागेचा प्रश्न, सिंघाडा उत्पादनासह जलाधारित रोजगार धोक्यात, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई, पावसाच्या पाण्याच्या साठवण व्यवस्थेवर विपरीत परिणाम.

“डिजिटल इंडिया” पोर्टल तसेच लेखी निवेदनाद्वारे यापूर्वीही तलावाच्या खोलीकरण व सौंदर्यीकरणाची मागणी करण्यात आली होती. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या निष्क्रियतेमुळे तलाव मालकाला अवैध भराव सुरू ठेवण्यास मोकळे रान मिळाल्याचे बोलले जात आहे.

पर्यावरण आणि जनजीवनावर घाला

तलाव बुजवल्यास होणारे परिणाम गंभीर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. भूजल पातळीत मोठी घट होण्याची भीती, गणेश व देवी विसर्जनासाठी पर्यायी जागेचा प्रश्न, सिंघाडा उत्पादनासह जलाधारित रोजगार धोक्यात, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई, पावसाच्या पाण्याच्या साठवण व्यवस्थेवर विपरीत परिणाम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here