prabodhini news logo
Home चंद्रपूर राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ, द्वारकानगरी, विकासनगर येथील महिला बचत गट यांच्या संयुक्त...

राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ, द्वारकानगरी, विकासनगर येथील महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने महिला प्रबोधन कार्यक्रम संपन्न

0
89

वरोरा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दिनांक 15 फेब्रूवारी रोज रविवारला वरोरा येथे राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ, द्वारकानगरी, विकासनगर येथील महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने बोर्डा ग्रामपंचायत,द्वारकानगरी येथील खुल्या मैदानात महिला प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा प्रा सूचिता खोब्रागडे, उदघाटक म्हणून डॉ जयश्री हटवार या होत्या,तर प्रमुख वक्ते म्हणून मा आनंदी चौधरी,मा प्रा विशाखा खोब्रागडे, मा अर्चना बन्सोड़ ,मा नीता घागी, मा अश्विनी राजुरकर या होत्या,प्रमुख उपस्थितीत मा प्रतिमा काटकर,मा योगिता लिंगे,मा वैशाली पाटील,मा जयश्री सातपुते, मा मनीषा ननावरे,मा शैला उरकुड़े या होत्या..
सदर कार्यक्रमात महानायिकांच्या जीवन संघर्षातून प्रेरणा घेऊन महानायिकांचे अपूर्ण काम पूर्ण करने,महिलांचे राष्ट्रव्यापी संग़ठन बनविल्याशिवाय महिलांच्या समस्याचे समाधान शक्य नाही,EVM च्या माध्यमातून लोकतंत्रावर कब्जा करून मनुस्मृति लागू करने व मूलनिवासी बहुजन समाजावर गुलामी थोपने विषयावर मार्गदर्शन करण्यात आले,महानायिकेचा इतिहास सांगणाऱ्या गान्यावर वैष्णवि,चौधरी, सौजन्या चौधरी,स्वरा घोड़मारे यानी नृत्य सादर केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा प्रा सूचिता खोब्रागडे यानी सदयस्थीतीत शिक्षण,आरक्षण,पेंशन,प्रमोशन,महिला असुरिक्षत कशा आहेत,बेरोजगारी कशी वाढलेली आहे,नोकरया कशा धोक्यात आल्या आहेत, है पटवून दिले तसेच सर्व समस्या सोडविन्यासाठी महानायिकेचा इतिहास वाचून प्रेरणा घेऊन आणि महिलांचे राष्ट्रव्यापी संग़ठन असल्याशिवाय समस्या सुटनार नाही याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
उपस्थित सर्व व्यक्ताना डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित हिंदू महिलांची अवनीति व उन्नति है पुस्तक भेट देण्यात आले,
सदर कार्यक्रमाला द्वारकानगरी, विकासनगर येथील महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्र संचालन मा वैशाली पाटील,प्रास्ताविक मा लिना मुंजनकर, तर आभार प्रदर्शन मा अर्चना पोफळे यानी केले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here