prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – जाणता राजा श्री....

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – जाणता राजा श्री. छत्रपती शिवाजी महाराज

0
94

सह्याद्रीच्या कडे कपारी
भगवा झेंडा फडफडतो
दरीदरीतून स्वराज्याचा
सिंहनाद कानी दुमदुमतो

शिवरायांचे नाव हृदयी
कोरले आम्ही आदराने
जाणत्या राजाला मुजरा
करितो अंतरीच्या प्रेमाने

अन्यायाला प्रतिकार करूनी
उत्तर दिधले तलवारीने
शत्रूचा निःपात केला
राजांच्या गनिमी काव्याने

जिजाऊंच्या पोटी जन्मला
बाळ शिवाजी शिवनेरीवर
स्वराज्याचा सूर्योदय झाला
तोफ कडाडे गडकिल्ल्यांवर

राजकारणाचे बाळकडू
मिळाले बाल शिवबाला
मावळ्यांस सोबती घेऊनी
शपथ घेतली रायरेश्वराला

एक एक किल्ला सर करून
केला श्वास मोकळा जनतेचा
प्रस्थापिले स्वराज्य न्यायाने
मार्ग सुकर झाला रयतेचा

वर्तमान आहे कठीण परी
झुंजण्या शक्ती भवानीची
भ्रमित मनाला मार्ग दावाया
आस शिवनेरीच्या सूर्याची

आजही आम्हा गरज आहे
तुमच्या धुरंदर कर्तृत्वाची
राजे पुन्हा जन्माला या
सावरा आता घडी नेतृत्वाची

सौ.वंदना शशिकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here