prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – आई

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – आई

0
122

धरतीच्या उदरातून उगवे अंकुर चिमुकला
चमत्कार हा मातृप्रेमाचा पान्हा फुटला

प्रेमच आहे दुसरे काय आईचा प्रवास
नवनिर्मितीची निसर्गाची पूर्ण जाहली आस

खडकातून हळूच डोकावे एक हिरवे रोप
मायेचा विस्मयकारी प्रवास आईचेच हे रूप

सामावले अवघे विश्व आईच्या जिव्हाळ्यात
नसते ते प्रेम कधी कधी सगळ्यांच्या नशिबात

मातृप्रेमाचा योग आहे हा ज्यांच्या भाग्यात
ते खरे नशीबवान तिचा वाटा त्यांच्या उत्कर्षांत

खडतर, कठीण, मऊ कितीक आहेत अविष्कार
जिथे आई तिथे मात्र फुलतो फक्त प्रेमाविष्कार

आई तूच आदी तूच अंत हे जाणले ज्याने
सुख, समाधान, ऐश्वर्य मिळून जगे समाधाने

आई कायमच तुला माझे शत शत नमस्कार
वाढदिवसाच्या तुला शुभेच्छा कर शंभरी पार

(स्वरचित)
©® नीला चित्रे
चिंचवड, पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here