prabodhini news logo
Home कर्नाटक प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – जाणता राजा श्री...

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज

0
84

बलात्काराने धुमाकूळ घातलाय
तिथ वयाच कोणतंच नाही बंधन
अजाण चिमुकल्यावरही अन्याय
हृदयाचा मग उडतोय थरकाप

रागान मन पेटून उठतय
चार दिवस होतो गाजावाजा
माध्यमातून आवाज उठतोय
नराधमाना होत नाही सजा

राजे आपला पोशिंदा शेतकरी
वर्षभर कष्ट राहतो उपसत
तोच देतो जनतेला भाकरी
मालाची कवडीमोल किंमत

युवा पिढीला कुणीच नाही दाता
शिकून बेरोजगार आहेत फार
सगळ्या योजना कागदावर येता
होतो आतून भ्रष्टाचाराचा बाजार

विस्कटलेली घडी नीट करण्यास
राजे तुम्ही पुन्हा जन्माला या
हिंदवी स्वराज्याच्या रक्षणास
दिशाहीन देशाला सावराया

पुन्हा होणे नाही जाणता राजा
जिजाऊ सम घडविणारी माता
स्मरुनी करू नित्य मानस पूजा
चरणी टेकवूनी त्यांच्या माथा

प्रतिभा सडेकर
वडगाव बेळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here