prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – भेट तुझी नि...

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – भेट तुझी नि माझी

0
113

असा अचानक सामोरी आला
अन् भान हरपले माझे…
पाहुनी रूप तुझे
अन् भान हरपले माझे…

बोलत होतो रोज तरी
हुरहूर लागली होती
पहावया तुला एकदा
मी वाट पाहिली होती…

भेट आपली पहिली ती
आठवते मनात अजुनी
होता गुलाब फुलला
मन गेले होते मोहूनी….

करावा संवाद कसा
प्रश्न पडला होता…
पाहून तुला सामोरी
शब्द अडकला होता…

ओठ मिटून घेता
मौनाचे ते इशारे होते…
नजर कशी भिडावी
तू बंध सोडले होते…

गुलाब फुलला होता
रातराणी दरवळली होती
चाफा बोलका होता
अन् अबोली मुकी च होती….
अबोली मुकी च होती….

आशालता भोसले
इंदापूर,पुणे जिल्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here