prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – जाणता राजा श्री.छत्रपती...

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – जाणता राजा श्री.छत्रपती शिवाजी महाराज

0
102

छत्रपती शिवाजी महाराज
भारत मातेचा पुत्र शूरवीर
प्रजा न्यायप्रिय करुणासागर
जाणता राजा खंबीर (१)

स्वराज्य स्थापने करिता
फुंकले रणशिंग वादळापरी
तमा नाही स्वप्राणाची
गडकिल्ल्यावर गर्जला विजेपरी(२)

धैर्यशील स्वाभिमानी मनाचा
अन्यायाविरुद्ध पेटून उठला
प्रखर बुद्धि कुशल रणनीतीने
शत्रूचा डाव खरा मोडला(३)

जय भवानी जय शिवाजी
निनाद घुमे दाही दिशा
फडकावून भगवा ध्वज
जागविली स्वराज्याची आशा(४)

शौर्य पराक्रम जिद्दीने
प्रजेचे स्वप्न केले साकार
छत्रपती शिवाजी महाराजांनी
साम्राज्याचा केला विस्तार(५)

डॉ.स्मिता गजभिये
लाखनी, जिल्हा.भंडारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here