prabodhini news logo
Home ठळक बातम्या मराठी साहित्याचे अभ्यासक प्रविण खोलंबे यांना कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार...

मराठी साहित्याचे अभ्यासक प्रविण खोलंबे यांना कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

0
98

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज नेटवर्क – पुणे जिल्ह्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी महाविद्यालय पुणे.येथे अध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रविण खोलंबे.यांना यंदाचा कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.शिक्षण, साहित्य,समाज, सांस्कृतिक योगदानाबद्दल मराठी साहित्य, कला, सांस्कृतिक विकास परिषद पुणे,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
त्यांनी विविध विषयांवर वैचारिक केले आहे.
महाराष्ट्राची लोककला हा संदर्भ लेख संग्रह.लेखक, निवेदक, सुलेखनकार, समुपदेशक,व्याख्याते, संशोधक,अशी विविध बिरुदे त्यांच्यावर लावली जात आहेत.
विविध विषयाचे वाचन करुन विद्यार्थ्यांवर अमुल्य असे संस्कार देत असतात.
विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास कसा करता येईल.यासाठी ते विविध उपक्रम घेत असतात. त्यांच्या साहित्यीक, सामाजिक, शैक्षणिक प्रवासाचे असे अनेक पैलू समाजाला मार्गदर्शन ठरत आहेत.म्हणूनच,त्यांच्या निस्वार्थ प्रशंसनीय कार्याचा गौरव म्हणून,मराठी साहित्य, सांस्कृतिक,कला विकास परिषद. महाराष्ट्र राज्य.यांच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते सन्मान पूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.रविवार दि.२६ एप्रिल २०२६ रोजी.कविवर्य मोरोपंत नाट्य मंदिर,बारामती प्रशासकीय भवन.येथे १४ वे मराठी साहित्यिक,सांस्कृतिक कलावंत संमेलन संपन्न होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here