prabodhini news logo
Home ठळक बातम्या एपस्टीन फाईल प्रकरणी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; यवतमाळमध्ये मोदींच्या प्रतिमेची होळी करून...

एपस्टीन फाईल प्रकरणी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; यवतमाळमध्ये मोदींच्या प्रतिमेची होळी करून निषेध

0
75

यवतमाळ प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : जगभरात खळबळ माजवून देणाऱ्या एपस्टीन फाईल प्रकरणावरून आता भारतातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. या प्रकरणात भारतातील बड्या राजकारण्यांची आणि उद्योगपतींची नावे समोर आलेली असतानाही, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष मूग गिळून गप्प का आहेत? असा सवाल उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतला आहे. यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेची जाहीर होळी करून या प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी २ मार्च रोजी मुंबई येथे या प्रकरणावर जाहीर एल्गार पुकारला होता. देशातील प्रमुख नेत्यांची नावे या फाईल्समध्ये असतानाही विरोधी पक्ष गप्प का आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. याच पार्श्वभूमीवर राज्यभर आंदोलनाचे सत्र सुरू झाले आहे.

यवतमाळमध्ये झालेल्या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यकर्त्यांनी आपल्या तोंडाला काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. विरोधी पक्षांच्या मौनाचा निषेध करण्यासाठी हे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी एपस्टीन फाईल प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि सत्य जनतेसमोर यावे, अशी मागणी करण्यात आली.

या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांनी केले. यावेळी जिल्हा महासचिव ॲड. संजय इंगळे, अशोककुमार कयापाक, उपाध्यक्ष विशाल पोले, शहर कार्याध्यक्ष प्रमोद पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शैलेश भानवे, आनंद भगत, गजानन कोकाटे, यादवराव नगराळे, दीपक वीर, थावरुजी वैद्य, भीमराव शिरसाट, संतोष मसराम, नितेश पाटील, सचिन मोहोड, चंद्रकांत वाळके, उत्तम कांबळे, अरविंद दिवे, केशव भागवत, रामदास वीर, मीरा वीर, करुणा मून, संध्या काळे, भारती सावते, सविता तिडके, सुजाता नगराळे, माला पाटील, अंतरा अंबादे, लता भरणे, ईंदू सांगळे, विशाखा नगराळे, पूनम अंबादे, सुशीला गजभिये, विजया लोखंडे, माया मस्के, रेखा गजभिये आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनामुळे जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले असून, वंचित बहुजन आघाडीने या आंतरराष्ट्रीय मुद्द्याला स्थानिक पातळीवर आक्रमकपणे मांडल्याचे दिसून आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here