prabodhini news logo
Home चंद्रपूर आयुनी. गायत्री ताई यांचा रणरागिनी हिरकणी फाउंडेशनच्या वतीने सत्कार

आयुनी. गायत्री ताई यांचा रणरागिनी हिरकणी फाउंडेशनच्या वतीने सत्कार

0
62

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – जागतिक महिला दिनानिमित्त रणरागिनी हिरकणी फाउंडेशन बल्लारपूर तर्फे मार्कंडेश्वर हॉलमध्ये कार्यक्रम घेण्यात आला बल्लारपूरच्या गायत्री ताई अनिल रामटेके यांची अनेक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी महिला म्हणून त्याचप्रमाणे राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीमाई,तसेच त्याग मुर्ती रमाई यांचे कार्य घराघरापर्यंत पोहोचविण्याचे कार्य करतात आतापर्यंत त्यांचे 182 प्रयोग सादर झालेले आहेत.या सर्व कार्याची दखल घेऊन रणरागिणी हिरकणी फाउंडेशन घ्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला बल्लारपु नगराध्यक्षा अलका वाढई होत्या .बल्लारपूर महिला बालकल्याण समितीच्या सभापती एँड. मेघा भाले उपस्थित होत्या. रणरागिनी फाउंडेशनच्या फाउंडर प्रेसिडेंट स्नेहा भाटिया मॅडम आणि अध्यक्षा डॉ. सपना जैन उपस्थित होत्या. त्याप्रमाणे वैशाली जोशी, मनस्वी गिरे या उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाला महिलांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here