prabodhini news logo
Home गडचिरोली कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन जल्लोषात साजरा

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन जल्लोषात साजरा

0
96

आर.डी.अट्टेला
विशेष तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज सिरोंचा

सिरोंचा – दिनांक 8 मार्च 2026 आज कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या सभागृहात(KGBV)येथे ८ मार्च २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात कर्तृत्ववान महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
​या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एस्. रॉय मॅडम यांनी भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात श्री. अट्टेला सर यांच्या प्रास्ताविकाने झाली. आपल्या भाषणात त्यांनी जिजाऊंच्या संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. “राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले, म्हणूनच ते हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकले. आजच्या काळातील स्त्रियांनी देखील सक्षम शिक्षण घेतल्यास त्या भविष्यात नवी पिढी अधिक प्रगल्भ आणि सामर्थ्यवान घडवू शकतात,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
​कुमारी शिफा मॅडम यांनी असे संदेश दिले की, त्यांनी देशाच्या राष्ट्रपतींपासून ते अर्थमंत्र्यांपर्यंत आणि आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिकांपर्यंत सर्व कर्तृत्ववान स्त्रियांकडे पाहून प्रेरणा घ्यावी आणि स्वतःची प्रगती साधावी.कु. टेंभुर्णे मॅडम यांनी सावित्रीबाई फुले आणि इतर स्त्रियांच्या कार्याचे उल्लेख करत त्यांचे आदर्श घ्यावे असे सांगितले. कुमारी रवीना मॅडम यांनीही महिला दिनाच्या शुभेच्छा देत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कु. हर्षिता आणि कारुण्या यांनी केले. याप्रसंगी विद्यालयातील इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले, त्यामध्ये ​कुमारी. जयश्री ऊईके (गृहप्रमुख) कु. एम. आत्राम (लेखपाल) कु. आर. कोंडावार अध्यक्षीय भाषणात राय मॅडम यांनी सांगितले की, महिला ही आई, बहीण, मुलगी, पत्नी अशा विविध रूपांत समाजात महत्त्वाची भूमिका बजावते, त्यामुळे तिचा सदैव सन्मान झाला पाहिजे. ‘मुली शिकल्या तरच कुटुंबाची आणि समाजाची प्रगती होईल,’ हा विचार या कार्यक्रमातून मांडण्यात आला.
​या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मार्गदर्शन कु. मनीषा साखरे (मुख्याध्यापिका) यांनी तर नियोजन करून शाळेतील सर्व विद्यार्थिनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here