
स्त्री शक्तीचा रोवूणी झेंडा
झेप घेतलीस आकाशी
दाखवलेस तुझे कार्य
धैर्याने सारया जगाशी….१
वाहूनी संसाराचे ओझे
साभांळूनी संसाराचा भार
मनी भाव तुझ्या समर्पनाचे
नारीशक्ती तुझा जयजयकार….२
येऊ दे कितीही अडथळे
धैर्याने करीशी बाजूला
कुणीही नसू दे तुझ्या सवे
तुझीच तू सोबतीला…..३
धैर्यवान तू,शिलवान तू
स्वाभिमानी, कर्तृत्ववान
तुझ्या धैर्याला सिमा नाही
किती तू दयावान……४
अर्धपोटी उपाशी राहून
दुसर्यासाठी जगणारी
दया,क्षमा, शांतीची प्रतिक
जिवाला जीव तू देणारी…..५
तुझ्या किर्तीचा कळस
लाविला तु उंच अंबरी
धरणीवरती तू दिव्य शक्ती
अमर झाली तू नारी ….६
सौ रंजनाताई आटे
जिल्हा वर्धा















