prabodhini news logo
Home कारंजा प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष लेख – अपराजिता

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष लेख – अपराजिता

0
110

आपण स्त्रीला आई बहिण पत्नी, मैत्रीण अशा वेगवेगळ्या रूपात ओळखतो , परंतु स्त्रीचे हे रूप एवढ्या पुरतेच
मर्यादित आहे का ? तर नाही…
स्त्री ची व्याख्या याही पेक्षा अधिक मोठी आहे.
परंतु पुरूष प्रधान संस्कृतीच्या प्रभावामुळे अनेक पुरूष व खुद स्त्रियाना सुध्दा माहिती नसण्याची शक्यता आहे
बऱ्याच समाजात स्त्रीला देवीची, आदी शक्ती, आदी माया उपमा दिली जाते तिला पुजले जाते, आणि दुसरीकडे त्याच
देवीचा अवमान केला जातो. तिला अबला नारी समजल्या
जाते, भोगवस्तु व वापरण्याची वस्तू समजल्या जाते.
अशा प्रवृतीना पटवून द्यायचे आहे. स्त्री ही प्रेम मायेपोटी
सर्वस्व त्यागू शकते, तर स्वताच्या अस्मितेसाठी ती बदलू ही
शकते ,स्त्रीचा आदर सन्मान हा प्रत्येकाने करायला पाहिजे .
ती जिवनात लढा देत पुढे कसे जायचे हे शिकवणारी दिनदर्शिका आहे ती समाजाचा पाया आहे.
आहे. ती जननी जगाचा आधारस्तंभ आहे मग त्या आधार – स्तंभाला पाडण्याचा प्रयत्न का केला जातो.
तीने गाजविलेले शौर्य पुरुषापेक्षा कमी नाही .
इतिहासातील तीचे कार्य समाजासाठी एक दिशा व प्रेरणा आहे हे समाज मनाला कधी कळणार आहे .
समाजातील यशस्वी भूमिका म्हणजे स्त्रीने,कसे वागावे , बोलावे पोशाख कसा करावा आणि आचरण करणे अपेक्षित आहे.
उदा. मुली आणि स्त्रिया नी सामान्यतः स्त्रीलिंग पध्दतीने
कपडे घालणे आणि विनयशिल सामावून घेणारे आणि
पालण पोषण करणे अपेक्षित आहे. असे सांगितले जाते
बाबासाहेबांनी मनुस्मृती दहण केली म्हणजे , समाजात
समानता रूजली, किंवा स्त्रिला सर्व हक्क अधिकार मिळाले
असे होत नाही,रूढी परंपरावादी मनुवृतीचे लोक आजही घराघरात आहेत . व स्त्रीला तिच्या अस्तित्वाची जाणीव वेळोवेळी करून देतात.समानता आणायची असल्यास प्रथम विचारात समता आली पाहिजे.

हक्क कर्तव्ये यात समता आली पाहिजे, भ्रृण हत्या थांबवली गेली पाहिजे, पुरूषासारखी महीला कुठेही न घाबरता फिरली पाहिजे, न मागता तिचे हक्क तिला मिळाले पाहिजे हे आपण सांगत असलो तरी, असे मात्र घडत नाही.
आजही जगाला ” स्त्री नकोय एक मादी पाहिजे ” वरकरणी
हे शब्द अगदी साधे वाटत असले तरी त्यात दडलेला अर्थ
प्रचंड अस्वस्थ करणारा आहे, प्रगतीच्या आपण गप्पा मारतोय खरे पण आजही समाजाची नजर स्त्री कडे बघताना
संकुचित होताना दिसते. हे अधोरेखित सत्य आहे.
स्त्री आणि मादी — स्त्री ही एक संकल्पना आहे
एक अस्तित्व आहे ,ज्यात मन आहे बुध्दी आहे ,भावना आहे
विचार आहे. आणि स्वतः च एक असं व्यक्तीमत्व आहे.
स्त्री असणं म्हणजे केवळ शरीर असणे नव्हे तर त्या शरीरा-
पलीकडील प्रगल्भता आहे हे कधी समाजाला कळणार.
दुसरीकडे मादी हा शब्द जिथे फक्त शरीराचा प्रजननाचा
आणि भोगण्याचा विचार होतो . दुर्दैवाने आजही बऱ्याच
अंशी स्त्री कडे बघताना तिच्यातील माणसाला नाकारून
तिच्यातील मादी लाच महत्त्व दिले जाते.
हा फरक आपल्याला बऱ्याच वेळा दिसतो तिला देवी
नवदुर्गा, लक्ष्मी, सरस्वती म्हणून पुजल्या जाते पण जेव्हा
रक्तामासाच्या स्त्रीचा प्रश्न येतो तेव्हा मात्र तीला दुय्यम
स्थान दिल्या जाते हा समाजाचा दुटप्पी पणा दिसते.
जाहिराती पासून तर सिनेमा पर्यंत स्त्रीचं वस्तु होताना
दिसते तीचं खाजगी आयुष्य ही तीचं राहत नाही. तीचे स्वप्न
तिचे कतृत्व यावरून न तोलता तीच शरीर कसं आहे ती
दिसायला कशी आहे यावर तीची किंमत ठरवली जाते.
हीच खरी स्त्री जीवनाची व्यथा आहे.
प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये सुख दु:खाची वेगवेगळी वळणे येतात. तरीही स्त्री सर्व दु:ख आपलेसे करून जगत असते . तिचं स्वतंत्र अस्तित्व,समाज नकळत हिरावून घेते. आणि तु ऐक स्त्री आहे स्त्री सारखेच जगले पाहिजे ही जाणीव
तीला करून देते . बऱ्याच घरात सटीक दिमाखाचे लोक
असतात, घराणं, घरदांज पणा, धर्म समाज यांना मोठं स्थान
देतात, व घरातील स्त्रियाना, घरात एक प्रकारे बंदिस्त
करून ठेवण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या मनात भिती
असते. की घरातील, स्त्री, मुली बाहेर पडल्या, शिक्षण
घेतले, की घराण्याच्या मर्यादा मोडल्या जातात, घराण्याचे
संस्कार धुळीला मिळतील,जास्त ज्ञान झाले की बिघडतात म्हणून मुलीना मर्यादेपर्यंतच शिकविले पाहीजे, असे नियम लादले जाते .
आजही तीला तिचा जोडीदार तिच्या पसंतीने निवडण्याचा
अधिकार नाही, आई वडील म्हणतील तिच पुर्व दिशा असते.
पुरुषाची मनमानी मात्र पिढ्यानपिढ्या चालू असते, पण
स्त्रियांच्या बाबतीत ते दक्ष असतात, आणि त्यात त्यांना
मोठेपणा वाटते. एवढेच नाही तर तीने कोणाशी बोलावे
कोणाशी बोलू नये, अंगावर कुठल्या कपड्याचा पेहराव
असावा, सर्व मर्यादा आखून दिलेल्या असतात.
वास्तविक पाहता अशा लोकांना ना धर्माची ओळख असते
ना समाज नातेवाईकात उठबस, पण घरातील स्त्री वर्गावर वर्चस्व गाजवत असतात परंपरा धर्माच्या नावे काळ वेळ बदलत आहे पण माणसाची विचारसारणी आजही कुठे ना कुठे अवघडल्यासारखी वाटते तीच्या अस्तित्वाची ओळख समाजाला आजही पटलेली नाही.
ती कितीही श्रीमंत, सुशिक्षित घरातील मुलगी किंवा सुन असली तरी सासरी, माहेरी कधी ना कधी तरी तिच्या
भावना इच्छा अपेक्षांचा कोंडमारा होतोच.
पुर्वी पासूनच पुरूषसत्ताक पध्दतीचं वर्चस्व तीने निमुटपणे
स्विकारले, ती पतीसोबत सती जाणे असेल केशवर्पण असेल
किंवा देवदासी याप्रमाणे आणखी काही याचा मनातून
सौभाग्याचं देणं , ईश्वराची इच्छा म्हणून तिने स्विकार केला, धर्माच्या नीतीशास्त्राने पुर्वी पासून तिला अबला नारी म्हणून कमजोर केले ,कधी सत्यवादी हरिचंद्राने राणी म्हणून विकले, कधी पांचालीला वाटले, कधी भर सभेत चिरहरण झाले, कधी तिच्या चारित्र्यावर मनुविकाराचे शिंतोडे उडविले गेले कधी जिवन संगिनी म्हणून आत्मरूपे स्वतः समर्पन केले.
कधी अग्नी परिक्षा घेतली कधी आंधळ्या पती संगे पट्टी बांधून सत्वपरिक्षा दिली पण तिला जेव्हा
जेव्हा तिच्या अस्तित्वाची जाणिव झाली तेव्हा तेव्हा
तीने उठाव करण्याचा प्रयत्न ही केला . व आजही ती करत
आहे पण मनुविचाराच मानवी मनात भरलेलं भूत आजही उतरायला तयार नाही, स्त्रीला बंदिस्त करून ठेवण्यात या
मनुविचाराना धन्यता वाटते. तीने ” चुल व मुल ” या कक्षे
बाहेर जावूच नये असे वाटते. तीच्या गुदमरलेल्या श्वासाची
कोंडी सोडवण्यास कुणीही तयार नाही, समाजात कित्येक
अशा स्त्रिया आहे की त्यांना त्यांच्या अस्तित्वाची शेवटपर्यंत जाणिव,या ओळख होत नाही, गुदमरलेल्या श्वासासंगेच जगून आयुष्याची अंत्ययात्रा संपते किंवा समाजाच्या पसाऱ्यात तिचा नाहक बळी जाते , तिच्या अंधारलेल्या अस्तित्वाची खरी दिशा कोणती हेही समाज तीला माहिती पडू देत. बहुतेकदा तिचं अस्तित्व तिच्या घरातच छिनलं
जाते, कधी पतीचा जाच तर कधी सासुसासरे, ननंद भासरे
यांच्या कडे मोठे या नात्याने ही जबाबदारी सोपवली जाते
जे करतील ते मोठे असे नियम घालून दिल्या जाते तिच्या
मनाचा होणारा कोंडमारा, तिचे विचार समजून घेण्यास
कोणीही समोर येत नाही , तीने समोर पाऊल टाकण्याचा
प्रयत्न केलाच तर तिची दमकोंडी करायला किंवा नात्याशी
सुसंगत राहण्याची तिला शिक मिळते. तीला ही माहिती
असते.जोपर्यत आईवडील असतात तो पर्यंत माहेरचा रस्ता मुलीसाठी मोकळा असतो पण भाऊभावजय हे
फक्त सांगण्याच साठी असतात आईवडील गेले का मुलीच माहेरपण संपते. ते मग श्रीमंत असो किंवा गरिब हा
मुलीसाठी नियमच लादलेला असतो तसंही आईवडीलाची
मुलीला नेहमी समज असते. ज्याघरी मुलीला दिले तेच घर
मुलीचं सर्वस्व असावं ” विकली गाय तिची आशा काय ”
म्हणजे गाईला एकदा विकले की तिने परत मागे वळून पाहू
नये अशी मानसिकता असलेले लोक ही कमी नाही.
कधी तिच्यावर दु:खाचा प्रसंग आला पती वारला तरी
लेकराच्या भल्यासाठी तिचा घराचा रस्ता दाखविला जातो .
तीच्या मनाची अवस्था कुणीही समजून घेण्यास तयार
नसते. व मुलं आहेत आपलं घर जोडीदार नसला तरी
लेकरासाठी आपल्याला जगणे आहे हे कधी कधी खुशीने
तर कधी नाखुशीने स्विकारावे लागते. ही तीच्या अस्तित्वाची
खरी ओळख बनून जाते.
आणि तिचं आयुष्य नकळत अधोरेखित राहतं…..

नंदा भगत
कारंजा लाड, वाशिम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here