prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – नारी शक्ती

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – नारी शक्ती

0
85

तूच नारी तुच दुर्गा
अफाट शक्ती अंतरी
घेऊन हातात शस्त्र
कर वार दुष्टावरी।।१।।

नको होऊ कमजोर
तूच गं रणरागिणी
घे दुर्गेचा अवतार
तूच हो माय भवानी।।२।।

होवून चण्डिका माता
कर दुष्टांचा संहार
नको डगमगू कधी
कर सपासप वार।।३।।

आहे प्रचंड ही शक्ती
तार तूच या जगाला
तूच जगत माताही
सांभाळ या विश्वाला।।४।।

द्यावे आशिष आम्हाला
करतो आम्ही ही भक्ती
तूच जगत कल्याणी
तुझे नाव नारी शक्ती ।।५।।

प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे,
लातूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here