prabodhini news logo
Home कर्नाटक प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – जागतिक महिला दिन

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – जागतिक महिला दिन

0
89

आज आंतरराष्ट्रीय महिला दिन सर्वत्र अतिशय उत्साहानी साजरा होतो. आई बहीण आजी आत्या काकू अनेक रूपात ती वावरत असते. स्त्री ही आदिमायेच रूप शारदा सरस्वती दुर्गा अशा अनेक अवतारात ज्या वेळीं धरणी मातेवर संकट आले असुरांनी अराजकता माजवली त्या वेळी या स्त्री शक्तींनी आपले उग्र रूप धारण केले व संकटातून सुटका केली जिजाऊनी माऊलीनी शिवबा घडविला अहिल्या सीता तारा या पवित्र नारी होऊन अजरामर झाल्या अशी अनेक उदाहरणे आहेत आज आपल्या माननीय दौपदी मुर्म देशाच्या राष्ट्रपती आहेत तर नवीन पदभार स्वीकारलेल्या माननीय सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळत आहेत याचा आम्हाला खूप अभिमान आहे
आज सर्व क्षेत्रात स्त्रीया काम करताना दिसतात त्या आपला संसार सांभाळून हे जबाबदारीनं करतात. जन्मतःच तिच्या जवळ सहनशिलता संयम जिद्द चिकाटी हे गुण असतात् त्यामुळे ती यशस्वी होते ऐक काळ असा होता स्त्री फक्त चूल आणि मूल इतक्यातच गुरफटली होती पण आता तिला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली आणि ती बाहेरच्या जगात निर्भय पणे वावरत आहे कौतुकास्पद तिची घोडदौड चालू आहे फक्त तिला समाजाकडून कौतुकाची थाप हवी असते. हे सार करत असताना तीन स्वतःची काळजी घेणं गरजेच आहे ती स्वतः व्यवस्थित असेल तर तीच कुटुंब व्यवस्थित राहील ऐक स्त्री अनेक जीव घडवू शकते योग्य संस्कार तीच करू शकते समाज सुधारणेच काम तीच करू शकते येणाऱ्या नवीन पिढीला योग्य मार्ग दाखवून देशाच्या विकासात तिचा मोठा वाटा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही त्याच्या या कर्तृत्वाला माझा सलाम शेवटी मी म्हणेन
तु आहेस नारी शक्ती महान
घे घे उंच उंच भरारी
तु आहेस ग देशाची शान
तुझी किर्ती पसरो चौफेरी

प्रतिभा सडेकर
वडगाव बेळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here