prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – जागतिक महिला दिन

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – जागतिक महिला दिन

0
80

स्त्रीत्वाचा हा आविष्कार 
दाखवून दे जगाला
आत्मविश्वासाने जग
मनी पेटली जिद्दीला

आत्मनिर्भरता अंगी
आत्मसन्मान तो जप
मग होई  ध्येयपूर्ती
जग मागे आपोआप 

स्त्रीशक्ती जागर आईचा
अस्तित्वाच्या लढाईचा 
भेद नको स्त्री पुरुष
करू उदोउदो त्यांचा 

सिंधूताई, मेरी कोम 
आदिशक्ती ही जिवंत  
अरुणिमा आनंदी तू
कोण कुठे लपल्यात

आधुनिक दुर्गा, काली 
नारी आहे आदिशक्ती
सन्मानाने उंचावली
मान, मनी आहे भक्ती

कणखर बाणा तुझा 
तुकवावी आदराने
मान हेच ते अप्रूप
तूच जग अभिमाने

होई दुष्ट निर्दालन 
स्वत्व जपत करते
स्त्रीत्व शीलाचे पालन
मान स्वतःचा राखते

नारीचे अस्तित्व जणू
देवदेवतांचे प्राण
उपकार थोर, देते
मनु जातीला जीवन 

अष्टभुजारूपीणी
महाकाली तू तारिणी
ताठ उभी अस जगी
तूच तू रणरागिणी

(स्वरचित)
©® नीला चित्रे 
चिंचवड पुणे 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here