prabodhini news logo
Home चंद्रपूर जागतिक महिला दिनानिमित्य बाबूपेठ महिला गट तर्फे आनंद मेळावा तथा भव्य नृत्य...

जागतिक महिला दिनानिमित्य बाबूपेठ महिला गट तर्फे आनंद मेळावा तथा भव्य नृत्य स्पर्धेचे आयोजन

0
121

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – जागतिक महिला दिनाच्या शुभपर्वावर बाबूपेठ महिला बचत गट व सावित्रीबाई बहुउद्देशीय संस्था रणरागिणी महिला पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महिलांच्या नृत्य स्पर्धा तसेच आनंद मेळावा अटल बिहारी वाजपेयी क्रीडा संकुल बाबूपेठ येथे हजारो महिलांच्या उपस्थितीत पार पडले.कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार मा.विजयभाऊ वडेट्टीवार गटनेता,महाराष्ट्र विधानसभा (काँग्रेस पक्ष) तथा माजी विरोधी पक्षनेता यांचे शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी मा.दिप्ती सोनटक्के नगराध्यक्ष न प घुघूस,रामूभैया तिवारी माजी अध्यक्ष शहर काँग्रेस, मा,राजू रेड्डी उपाध्यक्ष न प घुघूस, मा.राजेश अडूर गटनेता मनपा,डॉ दिलीप कांबळे, प्राचार्य नरेंद्र बोबडे, कार्यक्रमाच्या मुख्य आयोजक चंदाताई वैरागडे संस्थापक अध्यक्ष महिला बचत गट यांचे सह सत्कार मुर्ती यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला.

महिला दिनाच्या औचित्याने चंद्रपूर शहरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कर्तृत्ववान महिलां वैद्यकीय क्षेत्र मा.डॉ प्रेरणा कोलते ,ओद्योगिक क्षेत्र मा.वनिता धोटे,सामाजिक क्षेत्र मा.शाईन शेख शैक्षणिक क्षेत्र मा.उमा कुकुडपवार, राजकीय क्षेत्र मा.दीप्ती सोनटक्के या पाच कर्तृत्ववान महिला भगिनीचा तसेच नवनिर्वाचित नगरसेवक मा राजेश अडूर,सचिन कत्याल, विनोद लभाने अभिषेक डोइफोडे,संजविनी वासेकर सोफिया तवंगर,महानंदा वाळके, आकाश मानकर, करिश्मा जंगम,अनिता चोखे, सोनिया उंदिरवाडे यांचाही सन्मान मा.विजय वडेटीवार, मुख्य आयोजक चंदाताई वैरागडे तसेच उपस्थित मान्यवर मंडळी यांचे शुभ हस्ते शाल,सन्मान चिन्ह व पुष्गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला .

कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेतून आयोजक चंदाताई वैरागडे यांनी बचत गट स्थापन करण्याचा उद्देश सांगताना बचतगट केवळ पैशाची देवाण घेवाण करण्यासाठी स्थापन केला नसून महिलाच सक्षमीकरण ,रक्तदान शिबिर,वृक्षारोपण ,गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा,आरोग्य तपासणी,आनंद मेळावे,सांस्कृतिक स्पर्धा,नृत्य स्पर्धा कोरोना काळातील एक घास मदतीचा उपक्रम असे एक ना अनेक उपक्रम राबविणारे आमचा महिला बचत गट आणि महिला पतसंस्था आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here