prabodhini news logo
Home चंद्रपूर सेल-चंद्रपूर फेरो अलॉय प्लांट (CFP) येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

सेल-चंद्रपूर फेरो अलॉय प्लांट (CFP) येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

0
117

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – सेल-चंद्रपूर फेरो अलॉय प्लांट (CFP) येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन 2026 उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महान महिलांच्या योगदानावर आधारित व्हिडिओ शो आयोजित करण्यात आला. महिला क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींवर प्रश्नमंजुषा घेण्यात आली तसेच सहभागी महिलांनी “महिलांचे अंतर्गत सौंदर्य” या विषयावर कोलाज तयार केले. याशिवाय विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले.
नियमित महिला कर्मचारी, कंत्राटी कामगार आणि अप्रेंटिस यांच्या मतमांडणी सत्रामध्ये त्यांनी आपले विचार व्यक्त केले व महिला असल्याचा अभिमान व्यक्त करत CFP, कुटुंब व समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याबाबत आपले अनुभव मांडले.
कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन श्यामली आर. लोखंडे, एएम – एचआर यांनी केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सेल-CFP चे कार्यकारी संचालक पी. मुरुगेसन यांनी होते. या प्रसंगी डी. व्ही. रवी चंदर, सीजीएम (मेंटेनन्स) व अतिरिक्त प्रभार एम अँड सी, के. एस. सुरेश, सीजीएम – प्रोजेक्ट, आर. डी. गायकवाड, सीजीएम – वर्क्स, एल. प्रवीण कुमार, जीएम प्रभारी – एचआर, शोभा शिवसंकऱण, जीएम प्रभारी – एफ अँड ए, उमेश एम. उके, डीजीएम – एचआर, अजय कुमार, एजीएम – ईडी सचिव, तसेच शकील अहमद खान, जेएम – एचआर उपस्थित होते.
स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली तसेच सर्व सहभागींस स्मृतिचिन्ह देण्यात आले.
या प्रसंगी कार्यकारी संचालक पी. मुरुगेसन यांनी सांगितले की महिलांना जन्मापासूनच समान संधी देऊन त्यांना सक्षम, सशक्त व समाजाच्या प्रगतीत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. आज महिला सर्व क्षेत्रांत आघाडीवर असून अनेक स्पर्धात्मक परीक्षांमध्येही त्या यश मिळवत आहेत. CFP मध्येही महिला सक्षमीकरण व त्यांच्या सहभागासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील.
शोभा शिवसंकऱण, जीएम प्रभारी – एफ अँड ए यांनी सांगितले की महिलांनी आपल्या कर्तृत्व व क्षमतेच्या जोरावर कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करू शकतात हे सिद्ध केले आहे. SAIL-CFP मधील विविध विभागांमध्येही त्यांचे योगदान मोलाचे आहे व त्यांची बहुपदरी काम करण्याची क्षमता कौतुकास्पद आहे. त्यांनी सर्वांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी सुरेखा आर. सरोदे, सेक्शन ऑफिसर – एचआर यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाचे समन्वयन एचआर विभागाने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here