
खरंच प्रत्येक स्त्रिच्या बाबतीत आत्मसन्मान मिळतं का?
माझ्या मते नाही?कारण साधारण स्त्री च आयुष्य वेगळ असते.. सर्वांचं करून पदोपदी अपमान केला जातो.का पण ती पैसे कमावत नाही म्हणून.. तिला का पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक नसतो.. आधीपासून असंच… नोकरी करणारी किंवा छोट्यामोठ्या उद्योग करून स्वतंत्र विचारांची जबाबदारी संपूर्णपणे पार पाडणारी स्त्री तिचा होत नसतो का अपमान घरी… कदाचित होत असेलच..
पण प्रत्येक महिलेला वाटतं सन्मानाने जगता यावे.. घरी काम करणारी असो किंवा नोकरी करणारी.. घरात अनेक ठिकाणी वृद्ध स्त्रिया च काही कारणाने मुलांना नको कान भरून संसारात आग लावुन मोकळं होतात तमाशा बघत बसतात.. स्वतः ही नीट जगत नाही.मुलाचा आयुष्यात ठिणगी टाकायला सुरुवात करून संपूर्ण आयुष्य खराब करण्यात मजा घेतात.व लेकरांच्या मनांवर काय परिणाम होईल व संपूर्ण परिवार उद्धस्त करण्यासाठी धडपडत असतात.. समाजात असे बरीच घरे आहेत.. जिथं आत्मसन्मान दुर प्रेमाचं बोलणं पण नसतं.. कशा पद्धतीने टिकणार छोटीमोठी संसार?? सतत घालून पाडून बोलणं अपमानास्पद वागणूक देऊन घरात, शेजारी, काय मिळतं अशा बायकांना..मुलाच वाटोळे करून… म्हणून व्यसनाधीन आहारी जाऊन अनेक आयुष्य विभक्त कुटुंब झाले आहे.सासु सासरे, नवरा चा जाचाला कंटाळून मुलासवे स्त्री अनेक या पिढीतील मुली आईवडिलांचा आधाराने जगत आहेत.. बाहेरून आलेल्या मुलींना जर आपलं म्हणुन वागणूक दिली आपल्या वंशाच्या वारसा पुढे नेण्यासाठी मुलांचं विवाह केला जातो.. त्या पद्धतीने सांभाळून घेतलं तर असे कारणं दिसणार नाही कदाचित? खूप बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.. लग्न म्हटले की.. बरंच काही बघुन वर्षभरात संसार मोडले आहे… छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या होऊन कधी विस्फोट झाला समजले नाही.. दरवर्षी प्रमाणे जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या जातात.पण प्रत्येक स्त्रिच्या बाबतीत आत्मसन्मान मिळतं का.काहीना मिळते समाजात वावरताना स्वतः चा कलागुणांनी.पण घरात कित्येक वेळा बरीच व्यक्ती असतात आयुष्य तणावाखाली वावरत असलेल्या महिला.. कसलं मग आत्मसन्मान…अरे म्हणुन च स्वार्थासाठी किती नात्यांचं घोट घेतला जातो.. आपल्याच लोकांकडून अपमान केला जातो. टीव्ही मालिकांतील काही भाग महिला बघुन तसेच करण्याचं प्रयत्न करतेय.. कसं छळायच सुनेला.. कसं मुलांना वेगळे करायचे… त्यानं पैसे मिळतात काम करायचं..बघावं आनंद करमणूक म्हणून..पण हे चित्र तर परिणाम घातक ठरते आहे.. दिवस भर टिव्ही सिरियल बघुन आपल्या घरात तसेच करून बघतात.. कशाप्रकारे डोकं चालवतात.. आश्चर्याची बाब आहे…
एका स्त्री धडपडत असते समाजासाठी काही तरी करावे.. आणि काही स्त्रिया व्यर्थ आयुष्य घालवतान दिसतात..
आत्मसन्मान म्हटलं की स्वतः चा नजरेत प्रामाणिक असुन जगावं तोच स्वतः चा मोठा आत्मविश्वास निर्माण करणारा सन्मान असतों..जग इकडे तिकडे बोलतोय..निंदकाचे घर असावे शेजारी ही म्हण प्रचलित आहे…पण खरंच मनापासून वाटते की.. आपलं आयुष्य आपण संघर्ष करून जगलोय.मनात कसलाही विचार न करता.तसेच दुसऱ्या च ही चांगले व्हावे यासाठी प्रार्थना नक्की करावी.. चांगले मनाची माणसं फार कमी आहे या जगात.. आपल्या आयुष्यात असेल तर नक्की सांभाळून ठेवावे..
सौ. सोनम वाढई गडचिरोली















