prabodhini news logo
Home गडचिरोली बारावीतील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर करण्यास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

बारावीतील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर करण्यास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

0
112

गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली यांच्या मार्फत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

उच्च शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया, व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडे जात वैधता प्रमाणपत्र असणे आवश्यक असल्याने, संबंधित विद्यार्थ्यांनी आपला प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह निश्चित मुदतीत सादर करावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत करण्यात आले आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज किंवा प्रस्ताव सादर केलेला नाही, त्यांनी ३१ मार्च २०२६ पूर्वी आपला प्रस्ताव संबंधित कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे. या मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव समितीमार्फत स्वीकारले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

म्हणून इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांनी याची नोंद घेऊन आवश्यक कागदपत्रांसह वेळेत प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली डॉ. सचिन मडावी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here