prabodhini news logo
Home चंद्रपूर अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड आणि थिऑसॉफिकल ऑर्डर ऑफ सर्व्हिसतर्फे प्रशांत रामटेके यांचा...

अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड आणि थिऑसॉफिकल ऑर्डर ऑफ सर्व्हिसतर्फे प्रशांत रामटेके यांचा गौरव

0
197

रवि आत्राम तालुका प्रतिनिधी, चंद्रपूर – नागपूर येथे दिनांक 15/3/2026 रोजी स्थानिक स्तरावर सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड आणि थिऑसॉफिकल ऑर्डर ऑफ सर्व्हिस यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथे एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते प्रशांत ताराचंद रामटेके यांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल यथोचित सत्कार करण्यात आला.
संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. स्मिता मेहेत्रे यांच्या हस्ते रामटेके यांना शाल, पुस्तक आणि वृक्ष देऊन गौरविण्यात आले. पर्यावरणाप्रती जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने सन्मानचिन्हाऐवजी देण्यात आलेले ‘वृक्ष’ या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले.
याप्रसंगी बोलताना डॉ. स्मिता मेहेत्रे यांनी प्रशांत रामटेके यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याचे कौतुक केले व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना रामटेके भावूक झाले होते. “अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड आणि डॉ. स्मिताताई मेहेत्रे यांनी केलेल्या या सन्मानामुळे सामाजिक कार्यासाठी मला नवी ऊर्जा मिळाली आहे,” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
या सोहळ्याला सावित्री ब्रिगेडचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here