
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – नागपूर – साहित्यिक क्षेत्रात समाजसुधारक विचार मांडणारे काव्य व लेखन केल्याबद्दल कवयित्री व लेखिका मा. शालिनी अनिता साधुजी चांदेकर यांना “जागतिक महिला दिन हिरकणी पुरस्कार – २०२६” प्रदान करण्यात आला.
अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड, नागपूर व थिऑसोफिकल ऑर्डर ऑफ सर्व्हिसेस, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. समाजजागृती, स्त्रीशक्ती, संस्कार आणि सामाजिक परिवर्तन या विषयांवर सातत्याने काव्य व लेखन करून समाजात सकारात्मक संदेश देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शालिनी चांदेकर यांनी केले आहे. त्यांच्या या साहित्यसेवेचा गौरव म्हणून त्यांना हा सन्मान देण्यात आला.
हा पुरस्कार डॉ. स्मिता मेहेत्रे अध्यक्ष – अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड, नागपूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या सन्मानाबद्दल साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवरांनी शालिनी चांदेकर यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शालिनी चांदेकर त्यांच्या साहित्यिक कार्यामुळे अशीच समाजात प्रेरणा निर्माण होत राहील अशी त्यांना सदिच्छा.















