
नागपूर:अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड आणि थिऑसॉफिकल ऑर्डर ऑफ सर्व्हिस यांच्या संयुक्त विद्यमाने १५ मार्च २०२६ रोजी नागपूर येथे एका विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शिक्षिका पिमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव (भोसले) ब्रम्हपुरी च्या उषा रामाजी ढोके (भुरे) यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘हिरकणी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
नागपूर येथील स्मिता मेहेत्रे यांच्या हस्ते उषा ढोके यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. समाजातील विविध क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी अखिल भारतीय सावित्री ब्रिगेडचे पदाधिकारी, थिऑसॉफिकल ऑर्डर ऑफ सर्व्हिसचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या सत्काराला उत्तर देताना उषा ढोके यांनी हा सन्मान आपल्या कार्याची पावती असल्याचे सांगून आयोजकांचे आभार मानले.
या पुरस्कारामुळे उषा रामाजी ढोके यांच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.















