prabodhini news logo
Home चंद्रपूर चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जीवनावर रविवारी चंद्रपुरात विशेष व्याख्यानाचे आयोजन

चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जीवनावर रविवारी चंद्रपुरात विशेष व्याख्यानाचे आयोजन

0
154

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर: भारतीय इतिहासातील महान सम्राट प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या गौरवशाली जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी चंद्रपूर शहरात एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, २२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृह येथे संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मा. इंजि. दिलीप वावरे असतील. याप्रसंगी मुख्य व्याख्याते म्हणून बौद्धकालीन इतिहासाचे गाढे अभ्यासक, लेणी तथा शिल्पकला तज्ञ मा. महेंद्र शेगावकर उपस्थित राहणार आहेत. शेगावकर आपल्या अभ्यासपूर्ण शैलीतून सम्राट अशोकांचे कार्य, त्यांचे धम्मविजय आणि तत्कालीन कला-संस्कृती यावर मार्गदर्शन करतील.
इतिहासाची ओढ असलेल्या नागरिक, अभ्यासक आणि तरुणांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here