prabodhini news logo
Home गडचिरोली माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची रमजान ईद निमित्त अरबाज शेख यांच्या...

माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची रमजान ईद निमित्त अरबाज शेख यांच्या घरी सदिच्छा भेट; सामाजिक सलोखा दृढ

0
78

गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्ताने माजी आमदार तथा भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश देत सामाजिक कार्यकर्ते अरबाज शेख यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी अरबाज शेख व त्यांच्या परिवाराला ईदच्या शुभेच्छा देत परस्पर सौहार्द वाढवण्याचे आवाहन केले.
या भेटीदरम्यान शिवसेना शिंदे गटाचे युवा जिल्हा प्रमुख दिपक भारसाकडे, आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा महासचिव उमेश उईके, जिल्हा सचिव सुरज मडावी, तसेच ऋषिकेश बारापात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी आमदार डॉ. होळी यांनी उपस्थित सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छा देत, “सण हे समाजाला एकत्र आणण्याचे माध्यम असून, परस्पर आदर आणि एकतेतूनच समाजाची प्रगती शक्य आहे,” असे मत व्यक्त केले.
या सदिच्छा भेटीत विविध समाजघटकांतील एकोप्याचे दर्शन घडले असून, उपस्थितांनीही एकमेकांना शुभेच्छा देत बंधुभाव अधिक दृढ करण्याचा संदेश दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here