
राजुरा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : वाढत्या उन्हाची तीव्रता आणि प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन, राजुरा-आदिलाबाद महामार्गावरील हरदोना (बु.) बसस्थानक परिसर व कुकुडसाथ फाटा येथे पाणपोईचे भव्य उद्घाटन करण्यात आले. युवा सामाजिक कार्यकर्ते तथा अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे चंद्रपूर युवा जिल्हाध्यक्ष चंपतभाऊ राजुरकर यांच्या पुढाकारातून हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे.
मौजा हरदोना (बु.) येथील महामार्गाचे काम सुरू असताना पूर्वीचा हातपंप काढण्यात आला होता. परिणामी, बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना आणि वाटसरूंना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. ही समस्या ओळखून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कोरपना तालुका संघटक चंपतभाऊ राजुरकर व त्यांच्या मित्रमंडळींनी स्वखर्चातून येथे पिण्याच्या पाण्याची आणि सावलीसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
या पाणपोईचे उद्घाटन अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभाऊ उपरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी चंपतभाऊ राजुरकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमासाठी आकाश ताकसांडे, निखिल चवले, संकेत कटाईत, अतुल पिंपळकर, समीर भोयर, सुरज सोयाम, अजय सोयाम, रोहित जवंजाळ, आकाश ताजने, अनिल डोंगे, सौरभ आत्राम, पवन निमकर यांच्यासह अनैशा संघटनेचे जिल्हा व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्रमंडळींनी मोलाचे सहकार्य केले. राजुरकर यांच्या या जनहितार्थ कार्याचे प्रवासी व वाहन चालकांकडून कौतुक होत आहे.















