prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – राजकारण

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – राजकारण

0
110

गोंधळ उडाला राजकारणाचा
घेतला सर्वसामान्यांचा बळी;
विकास देशाचा गेला चुलीत,
सत्तेसाठी अमानवी खेळी.

“विचार एकनिष्ठ अन् तत्वनिष्ठ”
ठरल्या सा-या फुकाच्या बाता;
सारे कसे एकाच माळेचे मणी,
उरला ना कोणी जनतेचा त्राता.

नेत्यांनी सत्तेच्या हव्यासापायी
राजकारणाची बदलली दिशा;
झाली पायमल्ली लोकशाहीची,
अन् देशाची होत चालली दुर्दशा.

कैफात सत्तेच्या झिंगता तुम्ही
कैफियत आम्ही सांगायची कुणा;
निस्तारणे तुमचेच संपत नाही,
लावत आले मतदारांनाच चुना.

गोंधळ उडाला नेत्यांचा असा
गाठला निर्लज्जतेचा कळस;
स्वतःची झोळी भरण्यात मश्गूल,
कसा बहरेल विकासाचा पळस?

रवि ताकसांडे
गडचांदुर जि.चंद्रपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here