
बलिदानाने त्रिमूर्तीच्या उगवली
क्रांतीची नवी पहाट
वीर शहीद जवानांनी
निमिॅली स्वातंत्र्याची वाट.१||
हसतमुख चढले फासावर
दोर नव्हे होती रेशमी पावनगाठ
रक्तानी लिहीली सुवर्णगाथा
देश अभिमानाने उभा ताठ.२||
क्रांतीवीरांनी स्वातंत्र्यासाठी
पेटवली क्रांतीची महा होळी
त्याच्या त्यागातून झाली भारतमाता मुक्त
स्वतंत्र्यभारत भाग्यआपुल्या भाळी.३||
सुजलाम सुफलाम भारत जरी
विषण्ण करीती मनाला
अनेक घटना
भ्रष्टाचार ,जातीवाद विषमता
एकता बंधुभाव न दिसेना.४||
ऋण तयांचे स्मरुया
उतराई होण्यासाठी
सजग होवून स्वप्न करू साकार
एकदिलीने एक होत
देशाला देवू नव आकार.
त्रिमूर्तीनां करीते वंदन
भारतमातेचे तेअभिमानी नंदन.
भारत माता की जय.
अंजली गरगटे
पुणे















